दोडामार्गात ठाकरेंची सेना नंबर वन : संजय गवस

Edited by: संदीप देसाई
Published on: February 04, 2024 15:00 PM
views 88  views

दोडामार्ग : ठाकरेंच्या दौऱ्यासाठी दोडामार्ग तालुक्यातून तब्बल १ हजारहून अधिक शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी जनसंवाद यात्रेत सहभागी झाल्याची माहिती तालुका प्रमुख संजय गवस यांनी दिली आहे. ग्रामीण भागातून ठाकरेंशी शिवसैनिक एकनिष्ठ असल्याची ही पोहोचपावती आहे अशी प्रतिक्रिया मिळालेल्या उदंड प्रतिसादावर गवस यांनी दिली आहे.

रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा झंजावती दौरा झाला. याची सुरुवात कोकणातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून झाली. या मतदारसंघातील दोडामार्ग छोटा तालुका असला तरी केसरकर यांना दमदार टक्कर देत शिवसैनिकांची एक मोठ बांधून ठेवण्याची किमया दोडामार्गेतील निष्ठावंत शिवसैनिक संजय गवस  व त्यांच्या टीमने केली आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवा सेनेचे तालुकाप्रमुख मदन राणे, नगरसेवक चंदन गावकर, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, विभाग प्रमुख दशरथ मोरजकर, शिवराम मोर्लेकर, संतोष मोर्ये, महिला आघाडीच्या विनिता गाडी, श्रेयाली गवस, संपदा देसाई, नयनी शेटकर, संदेश वरक, इस्माईल चांद, लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, युवा सेनेचे संदेश राणे आदींनी यासाठी मोठी मेहनत घेतली. कोणी कितीही वल्गना केल्या तरी निष्ठावंत शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत आहेत हेच आजच्या प्रचंड प्रतिसादाने अधोरेखित झाल्याचे गवस यांनी स्पष्ट केले असून खासदार विनायक राऊत व विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोडामार्ग तालुक्यात ठाकरे सेना पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य कायम राखणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात युवक वर्गाचा मोठा सहभाग होता.