
देवगड : देवगड तालुक्यातील फणसे गावातील उबाठा चे शाखा प्रमुख तसेच माजी सरपंचसह फणसे ग्रामस्थांचा आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी,बाळा खडपे, अमोल तेली, संजय बोंबडी, अंकुश टुकरुल आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाचे कार्यकर्ते दीपक गावकर, संतोष गावकर, उमेश गावकर, विनोद गावकर, आनंद राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे आमदार नितेश राणे यांचा चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.