ठाकरे शिवसेना उपतालुका संघटकपदी संदेश वरक यांची निवड

संघटना वाढीसाठी प्रयत्न करा | उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व तालुकाप्रमुख संजय गवस यांचं आवाहन
Edited by: संदीप देसाई
Published on: April 17, 2023 20:00 PM
views 103  views

दोडामार्ग : शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोडामार्ग उपतालुका संघटक पदी निवड अलीकडेच पुन्हा स्वगृही परतलेल्या संदेश वरक यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, शिवसेना नेते संजय पडते जिल्ह्याचे युवा नेते संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली संदेश वाघो वरक, यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोडामार्ग उपतालुका संघटक पदी निवड केली. या पदासाठी शुभेच्छा देत असताना संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व तालुकाप्रमुख संजय गवस यांनी केले आहे. श्री वरक यांना नुकतेच हे निवड पत्र देण्यात आले आहे.

यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस, तालुका संघटक मदन राणे, माजी नगराध्यक्षा लीना कुबल, शहरप्रमुख ओंकार कुलकर्णी, विनिता घाडी, श्रेयाली गवस, मिलिंद नाईक, संदेश राणे उपस्थित होते.