
सावंतवाडी : नगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष संपूर्ण ताकदीनीशी उतरणार असून नगराध्यक्ष सहित सर्व २० ही प्रभागाचे उमेदवार देणार असल्याचे सावंतवाडी उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी सांगितले.
सावंतवाडी नगरपालिका निवडणूक उबाठा शिवसेना पक्ष लढवणार आहे. नगराध्यक्ष सहित सर्वच्या सर्व वीस ही जागा पक्ष लढवणार असून पक्षाकडे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम महिला उमेदवार आहेत त्यांची चाचपणी सुरू आहे. तर प्रभाग निहाय वीस उमेदवार देखील निश्चित झाले आहेत त्यां सर्वांनी निवडणूक लढण्यासाठी इच्छुकता दर्शवली आहे. उबाठां शिवसेना पक्ष सावंतवाडी नगरपालिका निवडणूक लढण्यास सक्षम आहे. पक्षाकडे नगराध्यक्ष पदासाठी देखील एकापेक्षा एक उमेदवार इच्छुक असून त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे तशी मागणी केली आहे. परंतु अद्याप नगराध्यक्ष पदाचा चेहरा ठरलेला नाही असे सुभेदार यांनी सांगितले. इच्छुक नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांची यादी तयार असून त्यावर पक्षाचे वरिष्ठ अंतिम निर्णय घेणार आहेत. सावंतवाडी नगरपालिका निवडणूक उबाठा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष महाआघाडी कडून लढविली जाणार असून कोणाला ही नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही तरी यावर सर्व महाआघाडीचे नेते वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतील त्याप्रमाणे पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार असल्याचे उबाठा सेनेचे प्रवक्ते सुभेदार यांनी सांगितले.









