
सावंतवाडी : आमचा उमेदवार सामान्यांच्या घराघरात पोहचलेला आहे. हाक दिल्यावर साथ देणाऱ्या सीमा मठकर आहेत असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले.
शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार केला. यावेळी सीमा मठकर यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास श्री. राऊळ यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मठकर, उमेदवार श्रृतिका दळवी, प्रदीप कांबळे, चंद्रकांत कासार, आशिष सुभेदार आदि उपस्थित होते












