
वैभववाडी : येथील पंचायत समितीच्या नविन इमारतीतील अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहे.ही कामे पूर्ण झाल्याशिवाय इमारतीचं उद्घाटन करण्यात येऊ नये अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
पंचायत समितीच्या नविन इमारतीतीच्या उद्घाटनाची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. मात्र इमारतीतील काही कामे अपूर्ण आहेत. याबाबत शिवसेनेने गटविकास अधिकारी यांच निवेदनाद्वारे लक्ष वेधले.या इमारतीचं काम गेली दहा वर्षे सुरू आहे. मात्र अद्यापही काम पुर्णावस्थेत नाही. या इमारतीतील आस्थापनांनिहाय फर्निचर,रॅक, टेबल, खुर्च्या, संगणक टेबलयासह सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी व पंचायत समिती सदस्य यांची स्वतंत्र दालने व त्याचे सुशोभीकरण होणं गरजेचं आहे. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय उद्घाटन करण्यात येऊ नये. प्रलंबित कामांसाठी पालकमंत्री व शासनस्तरावर निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. इमारतीतील सर्व कामे पूर्ण करून घ्यावीत त्यांनतरच प्रशासनाने उद्घाटनाचा घाट घालावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी, शिवाजी राणे, सुनील रावराणे, विलास नावळे, अनिल नराम, गणेश पवार, दिनेश पालकर, अनंत नांदलस्कर, श्रीकांत डाफळे, छोटू गुरव, रवींद्र मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.