बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

Edited by: भरत केसरकर
Published on: February 13, 2024 13:08 PM
views 48  views

नवी दिल्ली : बारावीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी अनिवार्य असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय कोणतीही नियुक्ती देण्यात येऊ नये असे अध्यादेश केंद्राने आज जारी केले आहेत. त्यामुळे बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना आता टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरणार आहे.

पहिल्यांदा प्राथमिक शिक्षकांना टीईटी अनिवार्य होती. यानंतर माध्यमिक शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्याचा विचार होता.मात्र आता उच्च माध्यमिक शिक्षकांना सुद्धा ही अनिवार्य केल्याने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना आता टीईटी उत्तीर्ण होणे बंदनकारक असणार आहे. केंद्र सरकारने याबाबतचा आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहेह यामुळे टीईटी उत्तीर्ण झाल्याशिवाय नियुक्ती होणार नाही किंवा त्या शिक्षकाला मान्यता मिळणार नाही. केंद्र सरकारने हा घेतलेला निर्णय आता राज्यांना बंधनकारक राहणार आहे.