कुडाळ इथं भीषण अपघात..!

Edited by: भरत केसरकर
Published on: March 05, 2024 05:19 AM
views 3731  views

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ शहरा लागून जाणाऱ्या ओव्हर ब्रिजवर आज पहाटे ५ च्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून यामध्ये अन्य तिघे जखमी आहेत. जखमींना गोवा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, कार क्रमांक एम एच ०७ ए जी ६३७० ही कार सावंतवाडीच्या दिशेने जात होती. त्यावेळी ही कार अपघातग्रस्त झाली. हा अपघात कसा झाला याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून यावरून अपघाताची भीषणता दिसून येते.