औरंगजेबच्या स्टेटसवरून वेंगुर्ल्यात तणाव..!

Edited by: दिपेश परब
Published on: January 23, 2024 13:56 PM
views 878  views

वेंगुर्ला : औरंगजेब अखंड हिंदुस्थानचा बादशदा असा स्टेटस एका युवक व युवतीने शोषल मीडियावर टाकून धार्मिक भावना दुखावणार आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याबद्दल वेंगुर्ल्यात तणावसदृश परिस्थिती  निर्माण झाली. या प्रकरणी शहरातील हिंदू युवक वेंगुर्ला पोलीस ठाण्यावर एकवटले आहेत. 

याबाबत भाजप युवा मोर्चा व युवकांच्या वतीने वेंगुर्ला पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे. याबाबत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, काल दिनांक २२/०१/२०२४ रोजी राम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना वेंगुर्ला शहरातील काही विरोधक व समाजातील समाजकंटक यांनी इन्स्टाग्राम तसेच व्हॉट्सअॅप या सोशल मिडीयावर धार्मिक  भावना दुखावणारे स्टेटस स्टोरीला लावल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी अशा हिंदू विरोधक व समाजकंटकांवर आपलेकडून योग्यती कारवाई करण्यात यावी असं निवेदनात म्हटल आहे.

तसेच असे स्टेटस कोण फिरवत आहेत या मागचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी होतेय. याठिकाणी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, युवा मोर्चा तालुका पदाधिकारी पपु परब, भूषण सारंग, प्रणव वायंगणकर, हितेश धूरी, हेमंत गावडे, सनी मोरे, प्रणव गावडे, सुधीर पालयेकर, चतुर पार्सेकर, योगीराज पाटील, अमित म्हापणकर, वैभव होडावडेकर यांच्यासाहित शेकडो युवक वेंगुर्ले पोलीस स्थानकाच्या आवारात उपस्थित आहेत.