
दोडामार्ग : दोडामार्ग पिंपळेश्वर चौकात दोन वाहनांची धडकेत एक वाहन पलटी झाल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून दोन्ही वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
कर्नाटक राज्यातील निपाणी येथील तीन पर्यटक त्यांच्या कारने गोव्यात पर्यटनासाठी आले होते. पर्यटनाचा आनंद लुटून मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते दोडामार्ग मार्गे परतीच्या प्रवासाला निघाले. येथील पिंपळेश्वर चौकात ते आले असता समोरून येणाऱ्या मालवाहू टेम्पोने कारचालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली अन् टेम्पो तेथेच पलटी झाला. या अपघातात कारचे तसेच टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.










