टेम्पो - कारची जोरदार धडक ; कारचा चक्काचूर

Edited by: भरत केसरकर
Published on: November 22, 2023 14:43 PM
views 1040  views

कुडाळ : आकेरी - सावंतवाडी - गोवा येथील जुन्या महामार्गावरील कोलगाव येथे मियासाब समाधी जवळ कॅन्टर टेम्पो आणि मारुती सुझुकी स्विफ्ट कार मध्ये झालेल्या अपघातात ड्रायव्हरसह अन्य किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भयंकर होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे.

अपघातग्रस्त कार सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जात होती. तर कॅन्टर सावंतवाडीच्या दिशेने येत होता. मियासाब समाधी जवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी भेट दिली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेनंतर अपघात स्थळी मोठी गर्दी झाली होती.