कणकवलीत खड्डयात टेम्पो रुतला

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 07, 2025 19:01 PM
views 1126  views

कणकवली : कणकवली बाजारपेठेत नगरपंचायतीने नळ योजना पाइपलाइन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्डयात टेम्पो रुतल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर खड्डयात रुतलेल्या टेम्पो नागरिकांनी धक्का देऊन बाहेर काढला. 

कणकवली बाजारपेठेमध्ये नळ योजना पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्त्यावर खड्डा खोदला आहे. या खड्डयात शनिवारी सकाळी टेम्पो रुतल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर नागरिकांनी रुतलेला टेम्पो दे धक्का देत बाहेर काढला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. खड्डा न बुजवल्याने नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच पाईपलाईनच्या कामासाठी खड्डे दुकानांसमोर न.पं.खोदल्याने त्याचा त्रास दुकानदारांसह ग्राहक व नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे खोदलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.