
सावंतवाडी : कुणी कितीही ठराव घेतले तरी सावंतवाडीचे आमदार हे दीपक केसरकरच असणार आहेत. ज्या-ज्यावेळी केसरकरांना घेरले जात त्यावेळी त्यांच्यातील नेतृत्व उभारून येत. त्यामुळे जे होतय ते चांगल्यासाठी आहे. राजन तेलींमुळेच राणे- केसरकर संबंध बिघडले होते. आता तोच प्रयत्न तेली करत आहेत. मात्र, आता तेलींचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. राणे आणि केसरकर यांच्यात दुरावा निर्माण होणार नाही असं मत माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी व्यक्त केले. तर तेलींमुळेच कणकवली अशांत होती. ते सावंतवाडीत आल्यानं ती शांत झाली आहे असंही ते म्हणाले.
सावंतवाडीतून लढण्याची कुणाची इच्छा असेल तर चांगली गोष्ट आहे. सावंतवाडी ही सगळ्यांना हवीहवीशीच वाटणारी आहे. मात्र, कुणी कितीही ठराव घेतले तरी सावंतवाडीचे आमदार हे दीपक केसरकरच असणार आहेत. ज्या-ज्यावेळी केसरकरांना घेरले जात त्यावेळी त्यांच्यातील नेतृत्व उभारून येत. त्यामुळे जे होतय ते चांगल्यासाठी आहे. कणकवलीत तेली असेपर्यंत ती अशांत होती. ते सावंतवाडीत आल्यापासून सावंतवाडी शांत झाली आहे असं मत माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, निलेश राणे यांच्या खासदारकीला केसरकर यांनी प्रामाणिक काम केलं होत. त्याचे चांगले परिणाम दिसून आले होते. मात्र, नंतर राजन तेलींमुळेच राणे- केसरकर संबंध बिघडले. आता तोच प्रयत्न तेली करत आहेत. मात्र, आता तेलींचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. राणे आणि केसरकर यांचे संबंध चांगले आहेत. लोकसभेत मोठ मताधिक्य त्यांनी राणेंना इथून दिलं. राणे कुटुंबीयांनी देखील केसरकर यांचे त्यासाठी आभार मानले. त्यामुळे तेलींचे प्रयत्न आता फळाला येणार नाहीत असा खोचक टोला राजन पोकळे यांनी हाणला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, सायली होडावडेकर, पूजा नाईक, शिवानी पाटकर आदी उपस्थित होते.