
सावंतवाडी : गांधी चौकातील सभा आटोपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी तेली कुटुंबाकडून ठाकरे पिता-पुत्रांचा पाहुणचार करण्यात आला. यावेळी तेजस ठाकरे देखील उपस्थित होते.
राजन तेली यांच्या निवासस्थानी उद्धव व तेजस ठाकरे यांनी पाहुणचार घेतला. त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. भेटी दरम्यान तेली कुटुंबांची विचारपुस करत ठाकरेंनी राजन तेलींच्या मुलांना आशीर्वाद दिले.यावेळी माजी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शैलेश परब, उमेदवार राजन तेली, बबन साळगावकर, मायकल डिसोझा, इर्शाद शेख, महेंद्र सांगेलकर, प्रथमेश तेलींसह तेली कुटुंब उपस्थित होते.