'तेजस्वी' ढोल ताशा पथक | वारसा संस्कृतीचा...गजर ढोल ताशांचा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 21, 2024 14:55 PM
views 82  views

देवगड : देवगड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील महिलांना एकत्र करून पहिले महिला सांस्कृतिक ढोल ताशा पथक सिंधू संजीवन संस्था देवगड यांच्या मार्फत तयार करण्यात आले आहे. या पथकाचे पहिले वादन श्री देव कुणकेश्वर चरणीं महाशिवरात्रीचे औचित्य साधून व जागतिक महिला दीन निमित्ताने श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे होणार आहे. दिनांक १९फेब्रु. रोजी शिवजयंती निमित्त या पथकाचा नामकरणाचा उदघाटन सोहळा श्री देव कुणकेश्वर मंदिरात उत्साहात पार पडला. या वेळी श्री देव कुणकेश्वर मंदिर मध्ये२१ दिव्यांची दीप प्रज्वलित करून मान्यवर यांनी व्यासपीठावर येऊन देवगड तालुक्यातील सामाजिक पारंपारिक संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्दिष्टाने तयार करणात येणाऱ्या या महिला पथकाचे नाव “तेजस्वी” ढोल ताशा पथक देवगड, वारसा संस्कृतीचा … गजर ढोल ताशांचा… या असे नामकरण ठेवण्यात आले.

या कार्यक्रमासाठी देवगड तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होत यात प्रमुख म्हणजे ऐश्वर्या कळूषे विभागीय अधिकारी कुडाळ. वुक्षाली यादव गटविकास अधिकारी देवगड, संतोष लब्दे अध्यक्ष कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री लक्ष्मी नारायण दळवी फौंडेशनचे ट्रस्टी मंगेश दळवी, महेश ताम्हणकर सरपंच ग्रामपंचायत कुणकेश्वर, चंद्रकांत घाडी अध्यक्ष कुणकेश्वर हायस्कूल, शशिकांत लब्दे उपसरपंच ग्रामपंचायत कुणकेश्वर, दिनेश धुवाळी उपाध्यक्ष, शरद वाळके सचिव, अभय पेडणेकर खजिनदार, अजय नानेरकर सदस्य, संजय आचरेकर सदस्य, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री एकनाथ तेली उद्योजक, प्रसाद गोडबोले, रामदास तेजम, मार्तंड ढोल-ताशा पथक प्रमुख कुंदन भुजबळ, दृष्टी एंटरप्राइजस प्रतिनिधी उदय बारगुडे, राजेश जोईल महिला ढोल ताशा प्रतिनिधी सौ. प्रजोल राणे, सौ. सोनाली गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच तालुक्यातील सर्व गावातुन महिला प्रतिनीधिंनीही यात सहभागी झाले यामध्ये मान्यवर व सहभागी सर्व प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला.श्रीमती कळूषे विभागीय अधिकारी कुडाळ यांनी आपले विचार मांडताना सांगितले की भविष्यात हे ढोल ताशा पथक नावा प्रमाणे तेजस्वी आणि उंच उभारी घेऊन देवगड तालुक्याचे नाव महाराष्ट्राभर गाजवेल सिंधू संजीवन संस्था देवगड यांच्या नाविन्य पूर्ण उपक्रमाचे कौतुक देखील त्यांनी या वेळी केले. तसेच श्रीमती यादव यांनीही या पथकास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे निवेदन संस्थेचे वतीने अतिशय उत्तम रीतीने करत या पथकाची भविष्यातील उद्दिष्टे विस्तृतपणे माडंली. आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या मा• ऐश्वर्या कळूषे मॅडम विभागीय अधिकारी कुडाळ ह्यांचा वाढदिवस असल्याने केक कापून सर्वांनी वाढदिवस साजरा करत त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा दिल्या. व ढोल ताश्याच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या वेळी सूत्रसंचालकानी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.