
वैभववाडी : वैभववाडी व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष तेजस मनोहर आंबेकर यांची कोकणसाद Live च्या यंदाच्या व्यवसाय क्षेत्रातील स्मार्ट लीडर पुरस्कारासाठी निवड झाली.कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणेंच्या हस्ते हा शनिवारी कणकवली येथे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोकणच महाचॅनेल कोकणसाद लाईव्हचा ११वा वर्धापनदिन शनिवारी कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात संपन्न झाला.या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.यावर्षी व्यवसाय क्षेत्रात वैभववाडी तालुक्यातील तेजस आंबेकर यांची निवड करण्यात आली होती.श्री.आंबेकर हे गेली २४वर्षे कापड व्यवसायात काम करीत आहेत.या व्यवसायाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करून जनतेला सेवा देत आहेत.याचबरोबर "आम्ही वैभववाडीकर", रोटरी क्लब, दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ, व्यापारी मंडळ यां संस्थाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.तसेच वैभववाडी तालुका व्यापारी मंडळाच्या अध्यक्ष पदाचा कारभार देखील ते नेटाने संभाळत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोकण साद लाईव्हने व्यवसाय क्षेत्रातील मानाचा स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मानित केले.आम.राणेंच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.श्री.आंबेकर यांनी सहकुटुंबाच्या साथीने हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी कोकणसाद लाईव्हच्या संपादिका देवयानी वरसकर, दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.