सातोसा : सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज दिवाळी दिवशी सातोसा येथे चंद्रकांत पुंडलिक सातर्डेकर यांच्या शेतात भात कापणीचे प्रात्यक्षिक केले. सोबतच तब्बल साडे तीन तास शेतात थांबून शेतकऱ्यांसोबत शेतीच्या उत्पन्नाचा आढावा घेतला.
यावेळी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासोबत मडूरा मंडळ अधिकारी अशोक पवार आदी उपस्थित होते.