
देवगड : देवगड तालुक्यातील शेतक-यांनी 7/12 वर पीक पेरा नोंद करण्याचे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांच्याकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प (रब्बी हंगाम व संपूर्ण वर्षाची ई पीक पाहणी DCS) ची सुरुवात दिनांक 10 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. शेतक-यांनी आपल्या 7/12 वर पीक पेरा स्वतः अॅन्ड्राईड फोन व्दारे नोंदणी करायचा आहे. शेतकरी स्तरावर पिक पाहणी करण्यासाठीचा अंतिम दिनांक 24 जानेवारी 2026 पर्यंत आहे.
पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी व्हर्जन 4.0.5 या मोबाईल अॅप व्दारे करतांना अॅन्ड्रॉईड फोन आवश्यक आहे. सदर अॅप गुगल क्रोम अपडेट करून मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. ई पीक पाहणी अॅप व्दारे शेत बांधावर जावून पीकांची नोंदणी करून माहिती अपलोड करावी. सदर कामी संबंधीत शेतक-याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास अथवा हाताळता येत नसल्यास, संबंधीत गावाचे तलाठी, कोतवाल तसेच संबंधीत गावात नियुक्त केलेले सहायक यांची मदत घेवून आपल्या पीकांची नोंदणी ई पिक पाहणी अॅप व्दारे करून घेण्यात यावी. सदर अॅप विषयी काही अडचण असल्यास संबंधीत गावाचे ग्राम महसूल अधिकारी तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, आपल्या गावातील DCS करिता नियुक्त सहाय्यक यांची मदत घ्यावी.
ई - पीक पाहणी व्दारे पीकांची नोंदणी न केल्यास आपल्या 7/12 वर पीक पेरा कोरा राहील. जो नंतर भरता येत नाही त्यामूळे पीक विमा, व इतर शासकीय अनुदान व लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होईल. ऐनवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गीक आपत्ती या बाबत पिक विमा मिळण्यासाठी 7/12 वर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांनी 24 जानेवारी 2026 पुर्वी आपल्या रब्बी पिकांची व फळपिकांची नोंदणी करून घेण्यात यावी, असे आवाहन तहसिलदार रमेश पवार यांनी केले आहे.










