
कणकवली : कणकवली पं. समितीचे माजी उप सभापती सदानंद गोविंद हळदीवे (बबन उर्फ मामा हळदीवे ) यांचा आज शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत पक्षप्रवेश मालवण नीलरत्न बंगल्यावर पार पडला या पक्षप्रवेश कार्यक्रमास कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे व शिवसेना उपनेते संजय आग्रे व जिल्हा प्रमुख दत्ता सामंत हे प्रमुख उपस्थित होते यावेळी श्री. हळदीवे यांना फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीमार्फत ए बी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, विधानसभा प्रमुख संदेश पटेल, तालुका प्रमुख मंगेश गुरव व शरद वायगंणकर, देवगड तालुका प्रमुख अमोल लोके, विलास साळसकर, दीपक पाटकर, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, राजन नानचे. मिथिल सावंत यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेची लोकाभिमुख धोरणे, विकासाभिमुख नेतृत्व तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन श्री. हळदीवे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या प्रवेशामुळे कणकवली तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.










