TEEN AGE मुलांनी स्वतःला सावरण्याचा काळ | RPD त किशोरवयीन मुलांसाठी डॉ. रुपेश पाटकर यांचं मार्गदर्शन

Edited by:
Published on: July 06, 2023 13:25 PM
views 92  views

सावंतवाडी : RPD हायस्कूलमध्ये प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी 'कुमारवयीन विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र' या विषयावर मार्गदर्शन केले. कुमारवय हा स्वतःला सावरण्याचा काळ आहे. या वयात जशा मुले चांगल्या गोष्ठी शिकू शकतात तशा चुकीच्या गोष्टींच्या आहारी सुद्धा जाऊ शकतात, त्यामुळे या वयात मुलांनी स्वतःला सावरलं पाहिजे असं डॉ. रुपेश पाटकर यांनी सांगितले. 


आपल्या या मार्गदर्शक वर्गादरम्यान त्यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनुभवांची विविध उदाहरणे देऊन त्यांनी आपले विषय मांडले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजेत, त्यांचे रूपांतरण करून त्या विकसित केल्या पाहिजे. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. त्याचप्रमाणे आपल्या मर्यादा शोधून त्या कमी केल्या पाहिजेत.

तसेच त्यांनी अल्कोहोल व सबस्टन्स डिपेंडन्स सिंन्ड्रोम या आजारांविषयी माहिती दिली. या आजारांमुळे अनेक कुमारवयीन मुले तसेच युवक दारूच्या आणि सिगारेटच्या आहारी जातात. त्यामुळे दारू आणि सिगारेट यांच्या पाहिल्या चवीपासून दूर राहून आपण हे आजार टाळू शकतो. इतर लोक आपल्याला हसले तरी ज्या गोष्टी योग्य असतात, त्या गोष्टींसाठी आपण ठाम राहिले पाहिजे. असाही सल्ला त्यांनी दिला.

त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया वरील उदाहरणांवरून प्रेम, वासना व आकर्षण या मधील फरक समजावून सांगितला. आपल्या व्यक्तीचे चांगले व्हावे असे वाटणे म्हणजे प्रेम, पण एखादी व्यक्ति हवी हवीशी वाटणे, सतत तिचा विचार असणे, तिने भेटावे, मेसेज करावे असे वाटणे व ती न भेटल्यास अस्वस्थपणा वाटणे हे आकर्षण होय. आकर्षण ही नैसर्गिक भावना आहे. हा गुन्हा नाही. पण या भावनेत वाहून जाणे मात्र धोकादायक ठरू शकते म्हणून आपल्याला यातला फरक कळला पाहिजे. आपण आपल्या भावना ओळखणे, त्या योग्य प्रकारे हाताळणे तसेच समोरच्याच्या व्यक्तीच्या भावना ओळखून त्याला योग्य प्रतिसाद देता येणे महत्त्वाचे आहे असेही डॉ. पाटकर म्हणाले.

मुलांनीही डॉ. पाटकर यांच्याशी यांच्याशी आपल्या मानतील शंका विचारत त्यांच्याशी संवाद साधला. सोप्या भाषेत हसत खेळत हे मार्गदशन झाल्यामुळे मुलंही मनमोकळ्या पणाने संवाद साधत होती. मुख्याध्यापक श्री. धोंड सर, सुमेधा नाईक मॅडम यांच्यासह इतर शिक्षक वर्गाचे या व्याख्यानासाठी सहकार्य लाभलं.