LIVE UPDATES

महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजारात शिक्षक पालक सभा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 05, 2025 15:01 PM
views 8  views

देवगड : देवगड तालुक्यातील महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार येथील शिक्षक पालक सभा संपन्न झाली. तळेबाजार हायस्कूलच्या सिद्धिविनायक सभागृहात ही सभा शिक्षक पालक यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी संस्था शिक्षक व  पालकांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ईश्वर स्तवन व स्वागत गीत सादर केले .यावेळी व्यासपिठावर वरेरी माजी सरपंच तथा संस्थेचे अध्यक्ष संदिप तेली,उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर,खजिनदार संतोष वरेरकर, म.गां.वि. मुख्याध्यापक राजेश वाळके, संस्था सदस्य विश्वास सावंत संस्था सदस्य बाळकृष्ण पारकर,रोहित म्हापसेकर, दत्तप्रसाद जोईल, माजी सदस्यआदी उपस्थित होते.

या कार्यक्रमानिमित्त रोहित म्हापसेकर व मंगेश रजपूत यांन कडून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप केल्याबद्दल त्यांचा प्रशालेतील सभेच्या वेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विजय पाताडे यांनी विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी 20 बेंचची व्यवस्था करून दिली. त्याबद्दल त्यांचाही सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता. यावेळी सन 2025 26 साठी शिक्षक पालक संघाचे स्थापना करण्यात आली. त्यावेळी पालकांमधून 11 पालक सदस्य म्हणून निवड करण्यात आली,विविध समित्यांची स्थापना यावेळी करण्यात आली. या प्रशालेचे  मुख्याध्यापक राजेश वाळके यांनी शाळेची संपूर्ण माहिती सभागृहाला दिली तसेच विद्यार्थ्यांच्या बाबतीतही माहिती आपल्या प्रास्ताविकातून देण्यात आली तसेच विविध योजनांची माहिती यावेळी जोईल सर यांनी दिली. पूजा दुखंडे यांनी पालकांमधून आपले मनोगत व्यक्त केले. या पालक सभेला 180 पालक उपस्थित होते.

शेतीची कामे बाजूला ठेऊन पालकांनि चांगल्या प्रकारे उपस्थिती दर्शवली होती. या सभे वेळी शाळेतील सर्वशिक्षक शिष्यकेत्तर कर्मचारी वृंद पालक विद्यार्थी वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संस्थेच्या माध्यमातून शाळेचे हाती घेण्यात आलेले काम पूर्णत्वाकडे जात असून त्यासाठी यापूर्वी पालकांनी जशी मदत केली त्याचप्रमाणे पुढील उर्वरित कामासाठी मदत करावी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा असे संस्थाचालकांनी यावेळी सूचित केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेली  यांनी केले. तर आभार प्रदर्शन कदम सर यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व संस्था पदाधिकारी पालक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील सरपंच पोलीस पाटील पालक वर्ग उपस्थित राहिल्या बद्दल या सर्वांचे आभार यावेळी कदम सर यांनी मानले.