अभिनेते अनिल गवस यांची मालवणात मुलाखत

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 21, 2025 14:11 PM
views 74  views

कणकवली : मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते अनिल गवस यांची प्रकट मुलाखत रविवार 22 जून रोजी स. 10  वा.  बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.  

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जून रोजी सेवांगणच्या सभागृहात ज्येष्ठ लेखक जयंत पवार स्मृती संमेलन अभिनेते अनिल गवस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात अभिनेते गवस यांची सदर प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.

अभिनेते गवस मूळचे दोडामार्ग मधील असून मराठीतील आजचे नाटक, चित्रपट आणि मालिका यामधील आघाडीचे अभिनेते म्हणून ओळखले जातात. संभाजी मालिकेतील त्यांची हंबीरराव ही भूमिका खूप गाजली आहे. तसेच जयंत पवार लिखित अधांतर या गाजलेल्या नाटकातील त्यांची ' राणे गिरणी कामगार ' ही भूमिकाही फार लक्षवेधी ठरली होती. हौशी रंगभूमीवर त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर व्यावसायिक नाटके, चित्रपट आणि मालिका यामध्ये गेली 30 वर्ष सातत्याने ते अभिनय करत आहेत.    त्यांच्या या प्रकट मुलाखतीचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.