
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नगरपालिकेच्यावतीने घरपट्टी व पाणीपट्टी तसेच इतर करांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या करवाढीस स्थगिती देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना योग्य ते आदेश देण्यात यावेत. तसेच करवाढ रद्द करणेसंदर्भात जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मुख्याधिकारी, सावंतवाडी व प्रांताधिकारी तथा प्रशासक, सावंतवाडी यांची बैठक, मुंबई येथे आयोजित करून मलाही या बैठकीस आमंत्रित करावं, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.