तुतारी एक्स्प्रेस मधून पडून तरुण गंभीर

Edited by:
Published on: January 02, 2025 11:24 AM
views 3049  views

रायगड :  रुपेश रटाटे : ओंकार राऊत ( वय वर्ष २४) राहणार देवगड सिंधुदुर्ग मधील तरुण सकाळी साडेतीनच्या सुमारास मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना रोहा व कोलाडच्या दरम्यान तुतारी एक्सप्रेस मधून पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. 

त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी ही माहिती माणगाव आरपीएफ यांना माहिती दिली. लगेचच रोहा पोलीस व बाहे गावाचे पोलीस पाटील व SVRSS टीम घटनास्थळी पोहोचले. पडलेल्या तरुणाला गंभीर दुखापत असून त्याला तातडीने रोहा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार दाखल करण्यात आले. गंभीर दुखापत असल्याकारणाने पुढील उपचाराकरिता  त्याला एमजीएम येथे हलवण्यात आले आहे.