तन्वी गोसावी ठरली 'मिस दीपावली'

Edited by: रुपेश पाटील
Published on: October 28, 2022 20:17 PM
views 231  views

भूषण आरोसकर 

सावंतवाडी : आरोस - दांडेली येथील जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने 'दीपोत्सव' कार्यक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या 'मिस दीपावली' स्पर्धेत तन्वी गोसावी हिने 'बेस्ट स्माईल'सह प्रथम क्रमांकाचा किताब पटकाविला. तर द्वितीय येण्याचा मान ईशा गोडकर व तृतीय क्रमांक स्नेहा शिरसाट हिने प्राप्त केला. दरम्यान 'बेस्ट कॅटवॉक' जान्हवी कवठणकर, तर 'बेस्ट हेअर स्टाईल'चा किताब नंदिनी बिले यांना देण्यात आला.

जय हनुमान मित्र मंडळाच्यावतीने दिवाळीनिमित्त 'दीपोत्सव' कार्यक्रमाच्या माध्यमातून या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे पहिल्या दिवशीचे उद्घाटन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, तर दुसऱ्या दिवशीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजू पांगम, दिलीप भालेकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, अमोल आरोस्कर, संजू पांगम, पोलीस पाटील चतुर मालवणकर आदी उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या समूह नृत्य स्पर्धेत कुडाळच्या चिमणी-पाखर ग्रुपने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर द्वितीय क्रमांक एम.जे डान्स अकॅडमी,  सावंतवाडी यांना देण्यात आला. खुल्या गटातील एकेरी नृत्य स्पर्धेत प्रथम नंदिनी बिले, द्वितीय नेहा जाधव व दुर्वी पावसकर विभागून, तर तृतीय समर्थ गवंडी आदींनी क्रमांक पटकाविले. तसेच गाव मर्यादित एकेरी नृत्य स्पर्धेत हर्षाली आरोसकर व विरा परब यांना विभागून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तर सानवी मोरजकर व हर्षा कवडेकर यांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला.

यावेळी घेण्यात आलेल्या लहान गटातील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम कार्तिक मडूरकर, द्वितीय स्वरूप माणगावकर, तर मोठ्या गटातून दीपेश शिंदे आणि शांताराम मालवणकर यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमात सिया राऊळ या पैठणीच्या मानकरी ठरल्या, तर दीपलक्ष्मी मालवणकर यांनी द्वितीय क्रमांकाचे चांदीचे नाणे जिंकले. दरम्यान विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

 वेशभूषा आणि मिस दीपावली स्पर्धेचे परीक्षण प्रवीण मांजरेकर, हेमंत मराठे व कृतिका कोरगावकर यांनी केले. तर नृत्य स्पर्धांचे परीक्षण ओंकार कलामंचचे अध्यक्ष अनिकेत आसोलकर व मुंबईस्थित नृत्यदिग्दर्शक मंदार काळे यांनी केले.  दरम्यान सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला गोवा-पार्से येथील प्रवीण पार्सेकर यांनी उत्कृष्ट साऊंड सिस्टिम दिली. तर रंगमंच, लाईट व सीटिंग अरेंजमेंटची जबाबदारी ओंकार नाईक व अमोल आरोसकर यांनी यशस्वीरित्या सांभाळली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा सेनेचे पदाधिकारी योगेश नाईक, जुईली पांगम, संदीप माणगावकर, संदीप पंत, रसिक दळवी, राजन मालवणकर, सिद्धेश मालवणकर, देवेंद्र माणगावकर, बाळा शिरोडकर, दिशा माणगावकर, श्रावणी नार्वेकर यांच्यासह जय हनुमान मित्र मंडळातील इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली.



जय हनुमान मंडळाचे कार्य कौतुकास्पद : राऊळ

दांडेली गावच्या जय हनुमान मित्र मंडळाचे सर्व युवक एकजुटीने व तळमळीने काम करत आहेत, या मंडळाचे दांडेली गावच्या विकासात मोठे योगदान आहे. या मंडळाचे कार्य  कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी काढले. 'दीपोत्सव' कार्यक्रमाचे उदघाटना राऊळ यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर दांडेली सरपंच कृष्णा पालयेकर, आरोस सरपंच शंकर नाईक, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, बाळा परब, तानाजी खोत, संजय पांगम, आबा सावंत, ग्रामसेविका वीणा धुरी, बाळा परब, बाळू गावडे, निलेश आरोलकर, पोलीस पाटील चतुर मालवणकर उपस्थित होते.