
सावंतवाडी : श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सावंतवाडी येथील वैश्यवाड्यात आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमात तनया वैष्णव मिशाळ पैठणीच्या मानकरी ठरल्या तर पाक कला स्पर्धेत पूर्वा जीवने - कानडे व सौ. अर्चना शिरसाट यांनी विजेतेपद पटकाविले.
वैश्यवाड्यात सलग तीन दिवस विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. सौ .ललिन तेली यांच्या सुश्राव्य कीर्तनाने श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तर साईश सुमेश शिरसाट श्री सत्यनारायण महापुजेचे मानकरी होते. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत - तिखट पदार्थ प्रथम - पूर्वा जीवने, द्वितीय निकिता भिसे, तृतीय संगीता म्हापसेकर, व उत्तेजनार्थ उल्का नार्वेकर , अपूर्वा शिरसाट, गोड पदार्थ - प्रथम - अर्चना शिरसाट, द्वितीय शोभा तेली, तृतीय - संगीता म्हापसेकर, उत्तेजनार्थ अक्षया म्हापसेकर, पूजा मिशाळ. पाक कला स्पर्धा वैभव म्हापसेकर यांनी पुरस्कृत केली होती. माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी पैठणी पुरस्कृत केलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रमात विजेत्या तनया मिशाळ, मडकईकर ज्वेलर्स यांनी पुरस्कृत केलेल्या एक ग्रॅम सोन्याचा नेकलेस उपविजेत्या अक्षया म्हापसेकर यांनी पटकावला. तृतीय क्रमांक लीना सुनील बांदेकर यांनी मिळवला. निवेदक शुभम धुरी यांच्या उपस्थितीत खेळ पैठणीचा सादर करण्यात आला. तसेच विवेक सावंत यांच्या स्मरणार्थ विशाल वासुदेव सावंत यांनी भाग्यवान प्रेक्षक स्पर्धा पुरस्कृत केली होती. यात लकी ड्रॉ पद्धतीने 10 विजेत्याना करण्यात आले. तसेच संस्कृतिक कार्यक्रमासाठी वैशाख मिशाळ यांनी सन्मानचिन्हे पुरस्कृत केली होती.
यावेळी लाव्या कोदे, निधी खडपकर, मायरा पनवेलकर, रिंकू किटलेकर, बाबली गवंडे, निरझर सुकी, राज मुंज, रोहित मुंज, श्रेया ईशानि मोहिनी शिरसाट, तनया शिरसाट, प्रणिती कालेलकर क्रिशा श्रीश्रीमाळ, ऐश्वर्या मठकर ओंकार गवंडे, लीना बांदेकर, ओंकार बिल्डिंग योगा ग्रुप, अंशिका तावडे ग्रुप आदींनी एकापेक्षा एक सरस संस्कृतिक कार्यक्रम शेकडो रसिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वैश्यवाड्यातील युवकांनी खूप मेहनत घेतली.











