तळवडे सरपंचपदी गोपाळ रुमडे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 24, 2023 19:32 PM
views 127  views

देवगड : तळवडे, येथील सरपंच पदाच्या काल झालेल्या निवडणुकीत तळवडे,तळेबाजार,बागतळवडे, ग्रामपंचायत सरपंचपदी श्री. गोपाळ सुर्यकांत रुमडे हे ५ मतांनी निवडून येत त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश लाड यांचा पराभव करत सरपंचपदा वर विराजमान झाले आहेत. पंकज दुखंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर तळवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी तळवडे ग्रामपंचायत येथे सरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली होती.

या साठी सरपंच पदासाठी भाजपचे गोपाळ रुमडे  व भाजपचे गणेश लाड असे दोन अर्ज दाखल झाले होते.त्यामुळे या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.यामध्ये भाजपाचे गोपाळ रुमडे यांनी गणेश लाड यांचा पराभव करत विजयश्री मिळवला आहे. त्यामुळे तळवडे सरपंच पदावर गोपाळ रुमडे हे निवडून आले आहे.या वेळी माजी सरपंच पंकज दुखंडे, श्र्वेता शिवलकर, ग्रामसेवक गुणवंत पाटील,सदस्या भावना शिंगारे, भाग्यश्री धुरी,सुजाता घाडी,मानसी माणगावकर,तसेच रोहित म्हापसेकर,सुधीर म्हापसेकर,राजेंद्र म्हापसेकर,बापू  जोईल, नंदू देसाई, संदीप साटम आदींनी सरपंच पदी विराजमान झालेल्या गोपाळ रुमडे यांचे अभिनंदन केले. यावेळी निर्णय अधिकारी तथा पिठासन अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी निवडणुकीचे सर्व काम केले.