
वेंगुर्ला: एप्रिल/मे २०२५ रोजी घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत तुळस होडावाडा येथील तालविश्व संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रारंभिक ते विशारद पर्यंतच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त करून विद्यालयाचे नावलौकिक वाढवले आहे.
या परीक्षेत प्रारंभिक पखवाज परीक्षेत विजय औदुंबर राऊळ, अक्षय गणपत आमडोसकर, हर्ष गुरुप्रसाद शेटकर, दशरथ गिरीधर राऊळ, युवराज अविलास परब, चिराग मनोज आईर, ज्ञानदेव नारायण राऊळ, वेदांत संतोष राऊळ, आयुष विठ्ठल राणे यांनी यश संपादन केले.
तसेच, प्रवेशिका प्रथम पखवाज मध्ये विघ्नेश रामदास नाईक आणि चेतन रामचंद्र धुरी यांनी यश मिळवले. प्रवेशिका पूर्ण पखवाज मध्ये संजय सुरेश मालवणकर, संचित सुनील कोरगावकर, पार्थ कमलेश गावडे, चैतन्य वामन मांजरेकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विशेष म्हणजे, विशारद प्रथम पखवाज मध्ये श्रावणी वैभव परब हिने यश प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक मनीष तांबोसकर व श्री निलेश पेडणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण कांदळकर आणि सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.