तालुकास्तरीय वैयक्तिक ''बालगीत सादरीकरण'' स्पर्धा

स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: March 06, 2025 13:02 PM
views 221  views

सावंतवाडी : स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले-तळीकर प्रतिष्ठानच्या आपण व्यक्त होऊया...! समिती तर्फे सावंतवाडी तालुक्यातील बालवाडी ते इ. दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ''तालुकास्तरीय वैयक्तिक बालगीत सादरीकरण स्पर्धा २०२५''चं आयोजन करण्यात आले आहे. स्व. प्रा. मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित केली आहे. 

बालवाडी ते दुसरी इयत्तेतील चिमुकल्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक १५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ठीक ०३.०० वा. राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेज, सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या 30 स्पर्धकांना सहभाग दिला जाणार आहे. 2 ते 3 मिनिटांचे सादरीकरण अपेक्षित असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी दि. 12 मार्च पर्यंत करायची आहे. नाव नोंदणीसाठी 9075119473 या नंबरवर WhatsApp द्वारे स्पर्धकाचे संपूर्ण नाव, मोबा. नंबर, इयत्ता व शाळेचा उल्लेख करून पाठवायचा आहे. बालगीत सादरीकरण हे मराठी भाषेतून व पाठांतर स्वरूपात असावे.  ही स्पर्धा बालवाडी ते इयत्ता दुसरी पर्यंत मर्यादित असून निःशुल्क आहे.परिक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून 15 मार्च रोजी ठिक 3.00 वा. स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकास रोख रक्कम १ हजार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास रोख ७०० रू. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास ५०० रू. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी २०० रू. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल, तर बक्षीस वितरण समारंभ याच दिवशी संपन्न होईल.

तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष स्व. प्रा. मिलिंद भोसले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार असून सचिव स्व. सुभानराव दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक, शैक्षणिक सेवा सन्मान देऊन शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे सचिव, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक यांचा गौरव करण्यात येणार आहे‌, अशी माहिती प्रतिष्ठानचे संचालक गौरव भोसले, विश्वस्त अनिल भोसले यांनी दिली आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या ३० जणांना प्राधान्य असल्याने स्पर्धकांनी नाव नोंदणी लवकरात लवकर करावी असं आवाहन आपण व्यक्त होऊया समिती प्रमुख निरज भोसले, कार्यक्रम संयोजक विनायक गांवस यांनी केलं आहे.