ठाकरे गटाची तालुका कार्यकारिणीची उद्या बैठक...!

Edited by: विनायाक गावस
Published on: July 02, 2023 12:29 PM
views 185  views

सावंतवाडी : सावंतवाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुका कार्यकारिणीची बैठक उद्या सोमवार दि. ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आदीनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित केली आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना, महिला आघाडी, युवासेना उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख, उपतालुका संघटक, विभागीयसंघटक, युवासेना विभागीय अधिकारी पर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच आजी- माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.