बॅनर फाडणाऱ्यांवर कारवाई करा | उबाठा सेनेने केली पोलीस निरीक्षकांकडे मागणी

Edited by: संदीप देसाई
Published on: September 28, 2023 17:45 PM
views 324  views

दोडामार्ग : गणेश चतुर्थी सणाच्या - पार्श्वभूमीवर गणेश भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी उ. बा. ठा. शिवसेना पदाधिकारी तसेच सरपंच यांनी तेरवण मेढे या ठिकाणी लावलेले शुभेच्छा बॅनर अज्ञातांनी फाडले. या घटनेचा शिवसेना पदाधिकारी यांनी निषेध नोंदवत गुरवारी दोडामार्ग पोलिसांनी निवेदन देत असे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचेकडे केली आहे.

याबाबत त्यांनी पोलिसांना निवेदन दिल असून त्यात म्हटले आहे की, तेरवण मेढे येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी यांनी  भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी तेरवण मेढे बस थांबा या ठिकाणी येथील सरपंच व संदेश वरक यांच्याफोटोसह इतर शिवसेना पदाधिकारी यांचे फोटो असलेले शुभेच्छा बॅनर लावले होते. हे बॅनर कुणी अज्ञातांनी रविवारी रात्री फाडून टाकले. सोमवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. या नंतर दोडामार्ग येथे शिवसेना पदाधिकारी यांनी या घटनेचा निषेध देखील व्यक्त केला होता. नंतर पोलिसांची भेट घेऊन घडलेल्या घटने बाबत फिर्याद दिली होती.

त्यांनंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या तालुका प्रमुख संजय गवस, युवा प्रमुख मदन राणे व पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांची भेट घेत सदर कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख तालुकाप्रमुख संजय गवस, युवा तालुका प्रमुख मदन राणे, तालुका संघटक लक्ष्मण आयनोडकर, उप तालुका संदेश वरक, संदेश राणे, संजय नाईक, प्रदीप गावडे, प्रदीप सावंत, राजू गावडे, एलविन लोबो, संतोष मोर्ये आदी उपस्थित होते.