तबलजींच्या जुगलबंदीनं रसिक मंत्रमुग्ध !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 27, 2024 07:51 AM
views 151  views

सावंतवाडी : पुण्यभूमी श्री दत्त मंदीर माणगाव येथे श्री सौर दत्तयाग निमित्त आयोजित 'तालसंध्या' कार्यक्रमात तबलजींच्या जुगलबंदीची मैफील रंगली. प्रसिद्ध तबला वादक  सिद्धेश श्रीकृष्ण कुंटे, निरज मिलिंद भोसले, सिद्धेश सावंत यांच्या तबला वादनान उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. 

सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम पुण्यभूमी श्री दत्त मंदीर माणगाव येथे पार पडले. सायंकाळच्या सत्रात 'तालसंध्या' कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध तबला वादक  सिद्धेश श्रीकृष्ण कुंटे, निरज मिलिंद भोसले, सिद्धेश सावंत यांच्या तबला वादन, कायदे वादन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. त्यांना संवादिनी साथ मंगेश रामचंद्र मेस्त्री यांनी केली. श्री दत्त मंदिर माणगांव न्यासच्यावतीन वादक कलाकार सिद्धेश कुंटे, निरज भोसले, सिद्धेश सावंत, मंगेश मेस्त्री यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर नेमळे हायस्कूलच्या बहारदार गोफ नृत्यानं उपस्थितांची मने जिंकली.

नितीन धामापुरकर व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमास रसिकांकडून दाद मिळाली. रात्री उशिरा आरती, श्रींचा पालखी सोहळा पार पडला. कीर्तनकार ह.भ.प. भास्करबुवा इंदुरकर यांच्या कीर्तनान कार्यक्रमाची सांगता झाली.