देवगड तालुक्यात 33 ग्रामपंचायत मतदानासाठी यंत्रणा सज्ज !

95 प्रभागासाठी 475 कर्मचारी नियुक्त
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 17, 2022 18:39 PM
views 163  views

देवगड : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतींसह एकूण आठ सरपंच व १४६ सदस्यांचा जागा बिनविरोध झाल्या असून ग्रामपंचायतींमधील उर्वरीत ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी १८ डिसेंबर 2022  रोजी होत आहेत. यासाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली असून ९५ प्रभागासाठी ४७५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 



देवगड तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये गवाणे, गोवळ, एकूण पाटगांव, आरे, चाफेड या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ३८ पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३३ ग्रा.पं.ची निवडणुक होणार आहे. तर ८ सरपंच बिनविरोध झाल्याने ३० ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी निवडणुक होणार आहे. १४६ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. रविवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वा. पासून मतदानाला सुरूवात होणार आहे. ३३ ग्रामपंचायतींच्या ९५ प्रभागांत मतदान होणार असून यासाठी ६ झोनल अधिकारी, ३३ निवडणुक निर्णय अधिकारी, ९५ केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलिस कर्मचारीसह ४७५ कर्मचारी मतदानप्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी १०४ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून यामध्ये ५ अधिका- यांचा समावेश आहे. ३२ पोलिस कर्मचारी पालघर येथून बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. याशिवाय ३३ होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत. १८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते ५.३० वा. पर्यंत मतदान कालावधी असून २० डिसेंबरला देवगड तहसील कार्यालयामध्ये सकाळी १० वा. पासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. ११ टेबलवर मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.