स्वाती हिंदळेकर यांचं निधन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 24, 2025 12:19 PM
views 271  views

मालवण : शहरातील भरड येथील रहिवासी स्वाती विलास हिंदळेकर, वय ६७ यांचे काल रात्री वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. आज सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार प्रशांत हिंदळेकर, साईश्रद्धा मोबाईल शॉपीचे मालक दीपक हिंदळेकर यांची ती आई होय.