
सावंतवाडी : श्री पावणाई देवी,काळकाई रवळनाथ, प्रभुवस सातेरी, घाडवस खातियेवस, म्हारिंगण दांडेकर पुरस्कृत माडखोल विकास पॅनलनं गावात प्रचारात आघाडी घेत डोअर टू डोअर प्रचारावर भर दिलाय. सरपंच पदाच्या उमेदवार श्रीम. स्वप्नाली राऊळ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवून नवीन व विश्वासू चेहऱ्यांना ग्रामस्थ संधी देतील असा विश्वास पॅनलच्या प्रमुखांकडून व्यक्त करण्यात आला.
माडखोल गाव व ग्रामपंचायत सद्यस्थितीत दशक्रोशीत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. परंतु गेल्या दहावर्षात विकासाअभावी आपला गाव मागे पडत आहे. ग्रामपंचायत इमारत जो आपल्या गावचा मानाचा बिंदू आहे. ती कर्जामध्ये आकंठ बुडाली आहे. सार्वत्रिक नळ योजना वीज बील थकीत असल्यामुळे बंद स्थितीत आहे. लाखो रुपयांचा निधी योग्य ठिकाणी खर्च घालू न शकल्यामुळे परत जात आहे. अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती तसचे स्ट्रीटलाईटची देखभाल हा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवून नवीन व विश्वासू चेहऱ्यांना ग्रामस्थ संधी देऊन बदल घडवतील व आपली ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांमार्फत चालवून समृद्धीकडे नेतील असा विश्वास ग्रामस्थ सुबोध राऊळ यांनी व्यक्त केला.
तर सरपंच पदाचे उमेद्वार श्रीम. स्वप्नाली संतोष राऊळ यांनी ग्रामस्थ आमच्या पाठीशी असून माडखोल विकास पॅनल परिवर्तन घडवून आणणार अस सांगत स्वतः सह पॅंनलच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकवटलो असून आमचा विजय हा निश्चित असल्याचा दावा संतोष राऊळ यांनी व्यक्त केला. तर विजय राऊळ म्हणाले, आम्हाला मिळत असलेला पाठिंबा पाहता येणाऱ्या वीस डिसेंबरला विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डोअर टू डोअर प्रचारावर भर देत त्यांनी आपला प्राचाराचा झंझावात सुरू ठेवला आहे. माडखोलला प्रगतीपथावर नेण्यासाठी नक्कीच ग्रामस्थ माडखोल विकास पॅनलला साथ देतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी सुबोध राऊळ,सरपंच उमेदवार स्वप्नाली राऊळ,संतोष राऊळ,विजय राऊळ, राजकुमार राऊळ, स्वप्नील लातये, आत्माराम लातये, चंद्रकांत म्हालटकर, लवू येडगे, राजेश येडगे, आनंद राऊळ आदि उपस्थित होते.