
सावंतवाडी : लोकमान्य ट्रस्ट संचालित देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वप्ना सुनील सावंत हिने एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई तर्फे घेण्यात येणाऱ्या हिंदी विषयाच्या पदव्युत्तर पदवी 2024-25 मध्ये संपूर्ण एसएनडीटी विद्यापीठामध्ये पहिला नंबर मिळवला आहे. तिच्या यशाबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे.
या यशासाठी लोकमान्य ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर व सचिव पंढरी परब संचालिका सई ठाकूर संचालक सचिन मांजरेकर समन्वयक डॉ. मिसाळे, सीन. एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुस्कर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर SNDT विद्यापीठा तर्फे स्वप्ना सावंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या यशामध्ये प्रा. आनंद नाईक व महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस यांचे सहकार्य लाभले. याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील विशेष कौतुक केलं आहे. सिंधुदुर्ग ही बुद्धिवंतांची खाण आहे याचा नेहमीच प्रत्यय येत असतो. स्वप्ना सुनील सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळवत ते अधोरेखित केलं आहे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे अशा शब्दात पालकमंत्री राणेंनी शुभेच्छा दिल्या.