
आ. दीपक केसरकरांनीही घेतलं दर्शन
सावंतवाडी : श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोंसले यांना स्वतः प्रदान केलेल्या पावन चरणपादुकांचे दर्शन अक्कलकोट राजघराण्याकडून प्रथमच सावंतवाडी नगरीत भाविकांसाठी खुले करण्यात आले.
या ऐतिहासिक दर्शन सोहळ्याचे आयोजन सावंतवाडी राजवाड्यातील दरबार हॉल येथे करण्यात आले आहे. याप्रसंगी राजघराण्याचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी विधीवत पूजन करून चरणपादुकांचे दर्शन सर्वांसाठी खुले केले. स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान, सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांनीही राजवाड्यात स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले. याप्रसंगी अक्कलकोट संस्थानचे तिसरे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.










