
चिपळूण : चिपळूण शहरातील मध्यवर्ती बस स्टँडशेेजारील प्रसिद्ध हॉटेल स्वागत व लॉजचे मालक पाडुरंग तथा जयंत कृष्णाची बापट, आज मंगळवारी, ता.१८ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये सकाळी साडेदहा वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७९ वर्षे होते.
परशुराम एज्युकेशन सोसायटीचे माजी उपाध्यक्ष व ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूणचे माजी उपाध्यक्ष, तसेच कृष्णेश्वर देवस्थानचे सभासद म्हणून त्यांनी काम केले होते. १९७३मध्ये स्वागत हॉटेलच्या माध्यमातून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा ऋषिकेश, जावई, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे. धार्मिक, परोपकारी वृत्तीचे होते. अनेकांना सहकार्याचा हात असायचा. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच, परिसरातील दुकाने, स्वागत रिक्षा स्टॉप व रत्नागिरी खाजगी बस व्यावसायिकांनी वाहतूक बंद ठेवली होती.