'स्वाभिमानी'चे कार्य आदर्शवत : मंत्री दीपक केसरकर

कोकण सुपुत्रांचा खान्देशात राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2024 14:21 PM
views 191  views

सिंधुदुर्ग : स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांचे समाजोपयोगी उपक्रम व आतापर्यंतची वाटचाल ही अनेकांना प्रेरणादायी असून त्यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यांनी असेच कार्य करत रहावे व समाजातील गुणवंतांना प्रेरणा द्यावी, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी काढले. शहरातील दाते रिजेन्सी येथे स्वाभिमानीच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यात दुरस्थ प्रणालीद्वारे मंत्री केसरकर यांनी  पत्रकार संघाच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कोकणातील सुपुत्रांचा खान्देशात राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.

धुळे येथे हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व संघाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व विशेष सन्मानार्थी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी, माजी स्थायी समिती सभापती शितल नवले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सतीश तात्या महाले, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार, ठाणे येथील पोलीस निरीक्षक मिलिंद बोरसे, पनवेल येथील आरटीओ अधिकारी धनंजय शिंदे, आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर, कार्याध्यक्ष प्रदेशाध्यक्ष किरण बागुल, पद्मश्री बिल्डर्सचे रावसाहेब पराग अहिरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बंडू नाना गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे, संघटक संतोष मिस्तरी, विनायक अहिरे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, मुंबई अध्यक्ष महेश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत दारोळे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जय भोसले आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योजक, प्रशासन, राजकीय, क्रीडा व प्रभावशाली राजकीय युवा व्यक्तिमत्व या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये कोकणचे सुपुत्र विनायक गांवस, सुमित दळवी यांचा आदर्श पत्रकार पुरस्कार, राष्ट्रीय कबड्डीपटू व मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख यांचा क्रीडारत्न पुरस्कार व प्रा. राजाराम परब यांना शिक्षण विभागातील पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच  शिवशंभू प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष जय भोंसले, साबाजी परब, ललित हरमलकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील म्हणाले, स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ हा संपूर्ण राज्यात कार्य करत आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर हे झपाटलेले व्यक्तिमत्व असून तळागाळातील वंचित घटकांसाठी ते सातत्याने सामाजिक कार्य करीत आहेत. पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होतो असे सांगत त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले.  शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सतीश तात्या महाले म्हणाले, धुळे जिल्ह्यातील अनेक समस्या सोडवत असताना नेहमीच पत्रकार बांधव मदत करीत असतात. माझ्या वैयक्तिक राजकीय यशामागे पत्रकार बांधवांचा मोठा वाटा असून स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचा आदर्श इतर पत्रकार संघांनीही घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. शितल नवले म्हणाले, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार, पुरस्कार विजेते डॉ. अभिनय दरवडे, अश्विनी कोळेकर, प्राध्यापक रवींद्र निकम  यांनी मनोगते व्यक्त करत स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या सुंदर उपक्रमाबद्दल धन्यवाद व्यक्त केलेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील, वहिदअली सय्यद यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदेशाध्यक्ष किरण बागुल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाभिमानी संघाचे सदस्य मुरलीधर खलाणे, पश्चिम महाराष्ट्र सचिव इकबाल मुल्ला, कोषाध्यक्ष दिनेश निकुंभ, श्री. विभांडीक यांसह सर्व पदाधिकारी व संस्थेच्या शिलेदारांनी विशेष परिश्रम घेतले.