
कुडाळ : ॲडव्हेंचर आणि दमदार कामगिरीसाठी ओळखली जाणारी 'सुझुकी व्ही स्टॉर्म 250 एसएक्स' (Suzuki V-Strom 250 SX) या नवीन दुचाकीचे अनावरण कुडाळ येथील श्री विनायक सुझुकी शोरूममध्ये नुकतेच उत्साहाच्या वातावरणात पार पडले. या दिमाखदार लॉन्चिंग सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते विवेक मुतालिक आणि श्री विनायक सुझुकीच्या पुजा सावंत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. मान्यवरांच्या हस्ते या अत्याधुनिक ॲडव्हेंचर बाईकचे भव्य उद्घाटन करण्यात आले. 'सुझुकी व्ही स्टॉर्म 250 एसएक्स' ही बाईक ॲडव्हेंचर राईडसाठी आवश्यक असलेल्या ताकद आणि तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ साधते.
या बाईकला 250cc सिंगल सिलेंडर, फोर-स्ट्रोक, ऑइल-कूल इंजिन देण्यात आले आहे, जे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सुरक्षित आणि नियंत्रित ब्रेकिंगसाठी ड्युअल डिस्क ब्रेक सोबत ड्युअल चॅनल एबीएस (ABS) चा वापर करण्यात आला आहे. नवीन डिजिटल स्पीडोमीटर सोबत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. राईडर्ससाठी टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन (Turn-by-Turn Navigation), कॉल आणि एसएमएस अलर्ट्स ची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट (USB Port) असल्याने प्रवासात मोबाईल चार्ज करण्याची चिंता मिटेल.
स्टायलिश एलईडी हेडलाईट बाईकला आकर्षक लूक देते. 205 एमएम (205 mm) ग्राउंड क्लिअरन्समुळे ही बाईक कोणत्याही खडबडीत किंवा आव्हानात्मक रस्त्यावर सहजपणे चालवता येणार आहे.
या गाडीची कलर शृंखला अत्यंत मोहक आणि लक्षवेधी आहे. ही बाईक पुढील आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे:
* पर्ल फ्रेश ब्लू
* चॅम्पियन येलो
* ग्लास स्पार्कलर्स ब्लॅक
* ग्लेसीयर व्हाईट
आकर्षक फीचर्स आणि मनमोहक रंगांसोबतच, श्री विनायक सुझुकी, कुडाळ येथे ग्राहकांसाठी मनमोहक ऑफर्स देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. ॲडव्हेंचर राईडची आवड असणाऱ्यांनी या बाईकची टेस्ट राईड घेण्यासाठी आणि विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी त्वरित श्री विनायक सुझुकी शोरूम, कुडाळ येथे भेट द्या आणि आपली 'सुझुकी व्ही स्टॉर्म 250 एसएक्स' बुक करा.










