नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलचं तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुयश...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 04, 2023 11:33 AM
views 99  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा दिनांक 3 आॅक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवेच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे.

१७ वर्षाखालील मुले गटामध्ये  प्रथम क्रमांक पटकावीला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक अमोल चौगुले यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई तसेच प्रशालेच्या सीईओ शुक्ला मॅडम यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.