राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती ; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

Edited by: दिपेश परब
Published on: August 06, 2023 11:47 AM
views 156  views

वेंगुर्ला : काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्याबद्दल काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने आनंद उत्सव साजरा करत शिरोडा एसटी स्टँड येथे फटाके वाजवत जल्लोष करण्यात आला. 

त्यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती तथा जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सिद्धेश परब, शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, माझी सभापती जगन्नाथ डोंगरे, तालुका काँग्रेस सदस्य कृष्णा आचरेकर, ग्रामपंचायत सदस्य बंड्या परब, आजगाव भोमवाडी उपसरपंच मायकल फर्नांडिस, रेडी विभागीय काँग्रेस अध्यक्ष मयूर आरोलकर, विशाल गावडे, संजय आचरेकर, विठ्ठल परब, सावळाराम गोडकर, गौरव परब, आनंद मसुरकर, सोनू गावडे, अभिजीत राणे, प्रथमेश हूनारी आदि उपस्थित होते.

शनिवारी दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी शिरोडा एसटी स्टँड  येथे राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्याबद्दल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.