एक्साईज पोलिसांना टीप दिल्याचा संशय ; रस्त्यात अडवत मारहाण

एका विरोधात गुन्हा दाखल
Edited by: दिपेश परब
Published on: August 18, 2023 21:13 PM
views 223  views

वेंगुर्ले : येथील पिराचा दर्गा येथे राहणारा रियाज महम्मद अली मुल्ला याने "तू माझी एक्साईज पोलिसांना टीप दिलीस" असे सांगत आपल्या पतीला भर रस्त्यात थांबवून मारहाण करून आपण विचारण्यास गेली असता आपल्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक केल्याची तक्रार वेंगुर्ला कलानगर येथील माधुरी फॅलिक्स फर्नांडीस हिने वेंगुर्ला पोलिसात दिली आहे. यानुसार पोलिसांनी रियाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

     पोलिसांकडे माधुरी फर्नांडीस यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १३ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता माझे पती फैलिक्स डॉमनिक फर्नांडीस हे मुलाचा वाढदिवस असल्याने रात्री केक आणण्यासाठी बाजारात जात असताना वेंगुर्ला बंदर रोड येथील सरकारी हॉस्पीटल समोरुन जाणाऱ्या रस्त्यावर पिराचा दर्गा येथे राहणारा रियाज महम्मद अली मुल्ला याने तेथे येवून माझे पती फैलिक्स यांना थांबवून शिवीगाळी करण्यास सुरवात केली, त्याबाबत माझे पती फैलिक्स यांनी त्यास विचारणा  केली असता तु माझी एक्साईज पोलीसांना टिप दिलीस असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. मला हे समजताच मी तेथे जाऊन त्याला अडवण्यासाठी मध्येच गेले असता त्याने माझ्यावर हात घालून मनात लज्जा उत्पन्न होईल असे बोलून तेथून निघून गेला असे तिने १६ ऑगस्ट रोजी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.