
कणकवली : कणकवली येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह इमारतीचे तब्बल ३४ लाख ९ हजार रुपयांचे भाडे शासनाकडून थकीत असल्या बद्दल या इमारतीचे मालक अनिल डेगवेकर यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरू केले होते. महाविकास आघाडी कडून या उपोषणाला पाठिंबा देत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. अखेर दुपारी महाविकास आघाडी समोर प्रशासन नमले व 34 पैकी 9 लाख रुपयांची रक्कम तात्काळ डेगवेकर यांना अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कणकवलीचे नगरसेवक युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली. या उपोषणाला कणकवलीतील काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष प्रदीप मांजरेकर व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर दुपारी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देखील उपोषणकर्त्यांची भेट घेत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. शासनाकडून येणे असलेल्या या रकमेबाबत अनेक स्तरावर निवेदने देऊनही कोणतीच कार्यवाही केली नसल्याने अनिल डेगवेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी अनिल डेगवेकर यांच्यासह कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, काँग्रेसचे कार्यकर्ते अभय शिरसाट पंढरीनाथ पांगम, अजय मोर्ये, प्रविण वरुणकर निलेश मालंडकर, आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या रेट्यासमोर अखेर प्रशासन नरमले असून, प्रशासनाने 9 लाख रुपयांची रक्कम तात्पुरत्या स्वरूपात व उर्वरित रक्कम निधी प्राप्त झाल्यानंतर देण्याचे मान्य केल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती नाईक यांनी दिली