
कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून काही पेशंटला सेवेअभावी मागे घरी जावे लागले होते. त्या संदर्भात आज सुशांत दळवी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा करत प्रश्नांचा भडीमार केला. केलेल्या चर्चेअंती प्रशासनाने सेवेअभावी मागे गेलेल्या रुग्णांना तात्काळ बोलवून त्याची रुग्णसेवा करण्यात येईल असे सांगितले तसेच मुबलक प्रमाणात जास्तीत जास्त प्रकारचा औषध साठा हा कणकवली दवाखान्यात ठेवण्याचा बंदोबस्त ही करण्यात येईल असे सांगण्यात आले. या आश्वासनाअंती सुशांत दळवी यांनी या प्रशासनाच्या आश्वासनाचा वेळोवेळी माझ्याकडून पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.
तसेच आरोग्य विषयात कोणाची हयगय मी करणार नाही आणि कोणालाही सोडणार नाही गोरगरीब जनतेची सेवा ही प्रामाणिकपणे प्रत्येक अधिकाऱ्याने केलीच पाहिजे त्यात पळवाट अजिबात नाही आणि ते माझ्या निदर्शनात आल्यास अजिबात खपवून घेणार नाही अशी तंबीच सुशांत दळवी यांनी सर्व प्रशासनाच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले.