सूर्यनमस्कार स्पर्धेत दुर्गा सरनाईक यांची बाजी !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 17, 2024 10:18 AM
views 57  views

सावंतवाडी : घे भरारी फाउंडेशन तर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिवसाचे औचित्य साधून सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा भोसले उद्यान सावंतवाडी येथे घेण्यात आली.

यामध्ये दुर्गा गौतम सरनाईक यांनी 289 सूर्यनमस्कार घालून प्रथम क्रमांक पटकाविला. मीना विठ्ठल पिंगुळकर यांनी 235 सूर्यनमस्कार घालून द्वितीय क्रमांक तर सुप्रिया संजय मुधाळे यांनी 202 सूर्यनमस्कार घालून तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच ज्योती दुधवडकर, वंदना मडगावकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस व  गोल्ड मेडल देण्यात आले. यावेळी घे भरारी अध्यक्षा मोहिनी मडगावकर, उपाध्यक्ष रिया रेडीज, खजिनदार शारदा गुरव, रेखा कुमठेकर ,साक्षी परुळेकर सुश्मिता नाईक, सीमा रेडीज, वैष्णवी बांदेकर, उमा चोडणकर आदि उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे निवेदन व आभार मेघना राऊळ यांनी मानले.