'सुर्गेंच्या वळेसारा'चा सुगंध दरवळणार !

दादांच्या काव्य संग्रहाचं मुंबईत प्रकाशन
Edited by: विनायक गांवस
Published on: May 24, 2025 12:33 PM
views 175  views

सावंतवाडी : मालवणी कवी दादा मडकईकर यांचा 'सुर्गेची वळेसार' मालवणी काव्यसंग्रह व ४५० म्हणींचा संग्रहाचे प्रकाशन मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री- मुंबई उपनगर अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवार २६ मे २०२५ सायंकाळी ६:०० वा.पु ल देशपांडे साहित्य अकादमी, लोककला दालन, ३ रा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. 'सुर्गेची वळेसार' मालवणी काव्यसंग्रह व ४५० म्हणींचा संग्रहाचे प्रकाशन मंत्री शेलार करणार आहेत. दादा मडकईकर यांनी 'चांन्याची फुला', 'आबोलेचो वळेसार', 'कोकण हिरवेगार' असे मालवणी काव्यसंग्रह लिहिले आहेत.

आपल्या खास शैलीनं रसिकांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कोकणातली लोकसंस्कृती, सणवार, परंपरा, लोककला आणि इथला निसर्ग त्यांनी आपल्या काव्यातून उलगडला आहे. आता सुर्गेंच्या वळेसारातून कवितांचा सुगंध सातासमुद्रापार दरवळला जाणार आहे.