
कणकवली : कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात सिंधुदुर्गसाठी असलेल्या मासेमारी, पर्यटन, आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामविकास, उद्योग, बेरोजगारी, रस्ते, वीज समस्या हे प्रश्न अभ्यासपूर्वक विधिमंडळात मांडले. याबद्दल आमदार निलेश राणे यांचे कणकवली माजी पं. स. सभापती सुरेश सावंत, सांगवे माजी सरपंच महेंद्र सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सिंधुदुर्गातील आरोग्य समस्या लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री नितेश राणे यांनी ८० डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठवले. बजेटवरील अभ्यासपूर्वक भाषण विधिमंडळात प्रश्न मांडल्यामुळे जनतेमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचं सुरेश सावंत म्हणाले.