सुरेश काळे यांचं दुहेरी सुयश

Edited by: विनायक गांवस
Published on: July 16, 2025 16:55 PM
views 131  views

सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक यांच्यावतीने May 2025  मध्ये देवगड अभ्यासकेंद्रावर नुकतीच  M.A.Ed अंतिम परीक्षा घेण्यात आली. दोन वर्षाचा शिक्षणक्रम  देवगड अभ्यासकेद्रावर सुरेश काळे यांनी 72.50% गुणासह प्रथम श्रेणीत यशस्वीरित्या पुर्ण केला. तसेच शालेय व्यवस्थापन पदविकाही DSM प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन दुहेरी सुयश प्राप्त केले आहे. 

हा अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य भालचंद्र मुंबरकर, प्राध्यापक दत्तात्रय गुलदगड यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सुयशाबद्दल विलवडे सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत शा. व्य.समिती अध्यक्ष रश्मी सावंत, उपाध्यक्षा विशाखा दळवी, सहशिक्षिका प्रमिला ठाकर, अंगणवाडी सेविका सायली दळवी, मनाली दळवी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती , ग्रामस्, बांदा केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, बांदा शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी सविता परब  सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके  महेंद्र चव्हाण, उदय सावळ, सुस्मिता मांगले, मंगेश मुद्रस, शांताराम असनकर, सावडाव केंद्रप्रमुख सदगुरु कुबल, सविता राऊत, शुभेच्छा सावंत, विनया शिरसाट, विजय  गावडे, नारायण नाईक, अमोल पाटील, सुनिल खरवत, भारती देसाई, जे. डी. पाटील,प्रविण कुडतरकर,प्रतिभा सावंत, अमोल आपटे, दासू गावित, मनोहर परब, शारबिद्रे व मित्र परिवाराने विशेष अभिनंदन केले आहे.