
दोडामार्ग : गेल्या अनेक वर्षांपासून गुरू शिष्य यांचे नाते ऋणानुबंध चालत आले आहे. पौराणिक कथांमध्ये याचे वर्णन केले आहे. ज्या गुरू मुळे आपण घडलो, त्याला शिष्य कधी अंतर देणार नाही. याची प्रचिती आजही येते गुरू पौर्णिमा निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक जण आपल्या गुरू जनांचे आशिर्वाद घेतात.
गुरू शिष्य यांचे नाते अतुट आहे. आपण गेली अनेक वर्षे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम केले. पण आजारपणामुळे आपण बाहेर पडलो. पण आजचे राजकारण हे किळसवाणे झाले आहे. सामाजिक बांधिलकी विसर पडला आहे. असे मत दोडामार्ग तालुक्यातील लोकनेते सुरेश दळवी यांनी व्यक्त केले. सुरेश दळवी यांच्या मुळे राजकीय सामाजिक क्षेत्रात आलेल्या शिष्य यांनी दळवी यांना राजकारणातील गुरू मानून त्यांचे आशिर्वाद घेतले.
दोडामार्ग तालुक्यातील लोकनेते सुरेश दळवी यांच्या मुळे दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात कार्यक्रम निर्माण झाले. त्यामुळे अनेक जण सुरेश दळवी यांना राजकारणातील गुरू मानतात. सुरेश दळवी हे जिल्हा परिषद अध्यक्ष ते जिल्हा बॅक उपाध्यक्ष, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या समवेत काम केले. पण गेल्या काही वर्षांपासून आजार पणामुळे ते राजकारणापासून दूर आहेत. पण सामाजिक कार्य सुरू आहे.
गुरूवारी गुरू पौर्णिमेनिमित्ताने दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप चांदेलकर ,संदीप गवस, ममता नाईक, उल्हास नाईक, सुदेश तुळसकर, गौतम महाले, आनंद तुळसकर, रविकिरण गवस यांनी दोडामार्ग येथे लोकनेते राजकारणातील गुरू सुरेश दळवी यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी सुरेश दळवी यांनी सर्व शिष्यांना आशिर्वाद दिले.
तुम्ही मनात आणल तर काही करू शकता. गेल्या तीन वर्षांपासून तुम्ही शिष्य या नात्याने आपले आशिर्वाद घेण्यासाठी येतात. आपण चांगले काम केले. आपणही यापुढे चांगले काम करावे समाजातील लोकांना न्याय द्या आजचे राजकारण हे किळसवाणे झालेले आहे. ते आपण दररोज बघत आहोत, असे सुरेश दळवी यांनी सांगून आपण राजकीय क्षेत्रात काम करणार नाही. पण तुमच्या पाठीशी आहे. असे सुरेश दळवी यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित शिष्य यांनी आम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रात घडलो हे सुरेश दळवी यांना गुरू मानून घडलो असे सांगितले. यावेळी सर्वाना सुरेश दळवी यांनी शुभेच्छा दिल्या